ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
मधमाशीच्या डंकामध्ये विष असते ज्यामुळे त्वचेवर इन्फेक्शन होण्याचा धोका वाढतो.
मधमाशीचा डंक त्वचेतच राहतो आणि हळूहळू विष पसरतो. चिमूट्याने किंवा बोटाने ते हळूहळू काढून टाका. डंक आणखी तुटणार नाही याची काळजी घ्या.
मधमाशी चावल्यानंतर त्वचेवर बॅक्टेरियाचा संसर्ग होण्याचा धोका असतो. प्रभावित भाग साबण आणि पाण्याने पूर्णपणे धुवून स्वच्छ करा.
बर्फाचा तुकडा एका कापडात गुंडाळून जखमेवर १० ते १५ मिनिटे शेक द्या. तुम्ही आईस पॅक देखील वापरु शकता. यामुळे सूज आणि वेदना कमी होण्यास मदत होते.
मधमाशी चावलेल्या ठिकाणी अँटीसेप्टिक क्रिम किंवा जेल लावल्याने सूज आणि इन्फेक्शन दोन्ही कमी होतात. दिवसातून २ ते ३ वेळा क्रिम लावा.
तुळशीची पाने, कोरफडीचे जेल किंवा थोडासा लिंबाचा रस लावल्याने खाज आणि जळजळ कमी होण्यास मदत होते. हे नैसर्गिक उपाय जलद आराम देतात.
जर वेदना किंवा खाज तीव्र असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि अँटीहिस्टामाइन औषध घ्या. जर तुम्हाला अॅलर्जी असेल तर तज्ञांचा सल्ला घेतल्यानंतरच औषध घ्या.