Manasvi Choudhary
अहमदाबादमध्ये एअर इंडियाचं प्रवासी विमान कोसळल्याची मोठी दुर्घटना घडली.
गुरूवारी अहमदाबादहून लंडनला जाणारं हे विमान अचानक कोसळलं.
या विमान अपघातात एकूण २४२ प्रवासी आणि विमानातील कर्मचारी याचं निधन झालं.
अशा परिस्थितीतही पायलटने MAYDAY MAYDAY असा कॉल दिला होता अशी माहिती समोर आली आहे.
मात्र MAYDAY MAYDAY हा कॉल नेमका आहे तरी काय हे जाणून घेऊया.
MAYDAY MAYDAY हा कॉल कोणत्याही विमानात इमर्जन्सी कॉल म्हणून दिला जातो.
यामध्ये विमान गंभीर संकटात किंवा काही घडणार असल्याची माहिती देते.
विमानात इंजिन निकामी होणं, विमानाला आग लागणं, विमानाची हवेत कोणत्याही गोष्टीशी टक्कर होणं अशी परिस्थिती.
अशावेळी विमानाच्या रेडिओवर तीन वेळा MAYDAY MAYDAY MAYDAY असं कॉल येईल ज्यामध्ये विमान इमर्जन्सी आहे अशी माहिती मिळते.
माहितीनुसार, MAYDAY कॉल दिल्यानंतर नियंत्रण कक्ष विमानाला मदत करते.
यामध्ये आपत्कालीन लॅडिंगची परवानगी , विमानाच्या एमर्जन्सीसाठी धावपट्टी निर्माण करणे, अग्निशमन दल तयार ठेवणे आदी.