Shruti Vilas Kadam
मॅट मेकअपमध्ये त्वचेवर अजिबात चमक दिसत नाही. हा मेकअप ऑइल-फ्री असून त्वचेला स्मूथ आणि फ्लॅट फिनिश देतो.
ड्यूई मेकअपमध्ये त्वचा नैसर्गिकरित्या चमकदार आणि फ्रेश दिसते. यात ग्लोइंग आणि हायड्रेटेड लूकवर भर दिला जातो.
ऑयली आणि मिक्स्ड स्किन असलेल्या व्यक्तींना मॅट मेकअप जास्त योग्य ठरतो. तो अतिरिक्त तेल नियंत्रित करतो.
ड्राय आणि नॉर्मल स्किनसाठी ड्यूई मेकअप उत्तम असतो. तो त्वचेला ओलावा देऊन हेल्दी ग्लो आणतो.
मॅट मेकअप प्रोफेशनल, क्लीन लूक देतो, तर ड्यूई मेकअप सॉफ्ट, युथफुल आणि नॅचरल लूक देतो.
ऑफिस, पार्टी किंवा लग्नासाठी मॅट मेकअप जास्त टिकाऊ असतो, तर ड्यूई मेकअप डे फंक्शन, कॅज्युअल आउटिंगसाठी योग्य असतो.
मॅट मेकअप जास्त वेळ टिकतो आणि कमी टच-अप लागतात, तर ड्यूई मेकअपला मधून-मधून टच-अपची गरज भासू शकते.