Shruti Vilas Kadam
काळी साडी आणि लाल ब्लाऊज ही क्लासिक व सदाबहार जोडी आहे. सण, लग्नसमारंभ किंवा पार्टीसाठी हा कॉम्बिनेशन खूपच आकर्षक दिसतो.
गोल्डन किंवा ब्रॉन्झ शेडचा ब्लाऊज काळ्या साडीला रॉयल लूक देतो. सिल्क किंवा बनारसी साडीसोबत हा पर्याय उत्तम ठरतो.
डार्क ग्रीन किंवा एमराल्ड ग्रीन ब्लाऊज काळ्या साडीवर फ्रेश आणि एलिगंट लूक निर्माण करतो. पारंपरिक कार्यक्रमांसाठी हा उत्तम पर्याय आहे.
ब्लॅक अँड व्हाइट कॉम्बिनेशन नेहमीच ट्रेंडमध्ये असते. साध्या पण क्लासी लूकसाठी पांढरा ब्लाऊज निवडू शकता.
ब्राइट पिंक किंवा राणी गुलाबी रंगाचा ब्लाऊज काळ्या साडीवर मॉडर्न आणि फेमिनिन लूक देतो. पार्टी किंवा फॅशन इव्हेंटसाठी योग्य.
रॉयल ब्लू किंवा नेव्ही ब्लू ब्लाऊज काळ्या साडीवर स्टायलिश आणि ग्रेसफुल दिसतो. संध्याकाळच्या कार्यक्रमांसाठी हा उत्तम पर्याय आहे.
साधी काळी साडी असेल तर प्रिंटेड, मिरर वर्क किंवा एम्ब्रॉयडरी ब्लाऊज घालून लूक अधिक हटके आणि ट्रेंडी बनवू शकता.