ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
जगातील सर्वात मौल्यवान आणि दुर्मिळ हिरा कोहिनूर आहे. जो की, १०५.६ कॅरेट आणि २१.१२ ग्रामचा आहे.
हिऱ्याचा इतिहास बघितला तर कोहिनूर हिऱ्याचा शोध गोलकुंडा खान, हैद्राबादमध्ये लागला आहे.
कोहिनूर म्हणजे तेज आणि प्रकाशाचा पर्वत.
हा हिरा अनेक पर्शियन आणि मुघल शासकांकडून आणि नंतर ब्रिटिशांकडे गेला.
आताच्या घडीला हा हिरा ब्रिटनचा राजा प्रिन्स चार्ल्स कडे आहे.
कोहिनूर हिरा हा विक्रीसाठी उपलब्ध नाही कारण की, तो अमूल्य मानला जातो.
एका रिपोर्टनुसार,हिऱ्याची किंमत जवळपास ५०० मिलियन डॅालर पेक्षा जास्त आहे.
भारतीय करन्सी नुसार, जवळपास ८ ते १६ हजार करोड रुपये आहे. कोहिनूर हिरा ब्रिटनकडून परत मिळवण्यासाठी भारत वेळोवेळी राजनैतिक प्रयत्न करित असतो.