ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
स्वप्नशास्त्रात प्रत्येक स्वप्नाचा वेगळा अर्थ आहे. यानुसार, स्वप्नं भविष्यातील परिस्थितींशी संबंधित संकेत देतात.
अनेकांना असे स्वप्न पडतात ज्यात ते खूप पैसे पाहतात किंवा नोटा मोजत असतात.
स्वप्नात पैसे दिसण्याचा अर्थ काय होतो, जाणून घ्या.
स्वप्नशास्त्रानुसार, जर तुम्हाला स्वप्नात कुठूनतरी पैसे मिळत असतील किंवा कोणी तुम्हाला पैसे देत असेल तर हे आर्थिक लाभ होण्याचे संकेत आहे.
जर एखाद्या व्यक्तीला स्वप्नात नाणी दिसली तर हे शुभ मानले जात नाही, भविष्यात आर्थिक संकट येऊ शकते.
जर तुम्हाला स्वप्नात पैसे हरवलेले किंवा फाटलेल्या नोटा दिसल्या तर ते अशुभ मानले जाते. यामुळे आर्थिक नुकसान होऊ शकते.
जर स्वप्नात कोण तुमचे पैसे चोरत असेल तर ते शुभ मानले जाते. याचा अर्थ लवकरच तुम्हाला आर्थिक लाभ होणार आहे.