ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
अन्नाप्रमाणेच निरोगी आरोग्यासाठी झोपही तितकीच महत्वाची आहे. तज्ञांच्या मते, झोपेच्या कमतरतेमुळे अनेक प्रकारचे आज आजार होऊ शकतात.
नॅशनल स्लीप फाउंडेशन आणि सीडीसीच्या अहवालानुसार, प्रत्येक वयोगटातील लोकांना वेगवेगळ्या प्रमाणात झोपेची आवश्यकता असते.
बाळांसाठी आणि मुलांसाठी झोप महत्वाची असते. ०-३ महिन्यांच्या बाळाला १४-१७ तासांची झोप, ४-११ महिन्यांच्या बाळाला १२-१५ तासांची झोप आणि १-२ वर्षांच्या बाळाला ११-१४ तासांची झोप आवश्यक असते.
३ ते ५ वर्षे वयोगटातील मुलांसाठी १०-१३ तासांची झोप खूप महत्त्वाची आहे, ६ ते १३ वर्षे वयोगटातील मुलांसाठी ९-११ तासांची झोप आवश्यक आहे.
१४ ते १७ वर्षे वयोगटातील व्यक्तींसाठी ८-१० तासांची झोप आवश्यक आहे.
१८ ते ६४ वयोगटातील लोकांनी कमीत कमी ७ ते ९ तासांची झोप घ्यावी.
६५ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या व्यक्तींसाठी ७-८ तासांची झोप आवश्यक आहे.