ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
१ कप मोरिंगा पावडर, १/२ कप भाजलेले बेसन, १/२ कप तूप, १ कप खजूर, १/२ कप बारीक चिरलेले ड्राय फ्रुट्स आणि १/२ कप वेलची पावडर.
सर्वप्रथम एका पॅनमध्ये थोडे तूप घाला आणि गरम करा.
एका कढईमध्ये बेसन चांगले सोनेरी होईपर्यंत भाजून घ्या, नंतर यामध्ये गरम केलेले तूप घाला आणि चांगले मिक्स करा.
बेसन आणि तूप चागंले मिक्स केल्यानंतर यामध्ये मोरिंगा पावडर मिक्स करा. हे मिश्रण २ ते ४ मिनिटांसाठी मंद आचेवर भाजा.
५ मिनिटांनंतर हे मिश्रण एक भांड्यात काढून थंड होण्यासाठी ठेवा, हलके थंड झाल्यास यामध्ये खजूरची पेस्ट, गुळाची पेस्ट, ड्राय फ्रुट्स आणि वेलची पावडर घालून मिश्रण चांगले मिक्स करुन घ्या.
आता, हाताला थोडे तूप लावून लाडू बनवा. हवाबंद डब्यात ठेवून तुम्ही हे लाडू १५ दिवसांसाठी स्टोअर करु शकता.
हेल्दी आणि टेस्टी मोरिंगा लाडू तयार आहे. ब्लड शुगर नियंत्रणात ठेवण्यासाठी नक्की फायदेशीर ठरेल.