ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
वजन वाढण्याचा संबध जास्त खाणे किंवा व्यायाम न करण्याशी जोडला जातो. परंतु, अनेकदा यामागे काही गंभीर आजार असतात. जे मेटबॉलिजम रेटवर परिणाम करतात.
थायरॉइड ग्रंथीच्या कार्य करण्याची क्षमता कमी झाल्यास मेटबॉलिजम रेट मंदावतो ज्यामुळे वजन वाढू शकते.
या स्थितीमध्ये शरीरातील स्ट्रेस हार्मोन म्हणजेच कॉर्टिसोलची पातळी वाढते आणि याचा परिणाम मेटबॉलिजमवर होतो. यामुळे व्यक्तीच्या चेहरा, पोट आणि पाठीमध्ये चरबी जमा होते.
हार्मोन्स असतुंलनमुळे महिलांमध्ये पीसीओएस म्हणजे पॉलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम होतो, ज्यामुळे वजन वाढण्याची समस्या होते.
शरीरात इन्सुलिन हार्मोन्स योग्य रित्या कार्य करत नसल्यास साखरेचे रुपातंर फॅट्समध्ये होते आणि वजन वाढते.
झोपेच्या कमतरतेमुळे हार्मोनल इमबॅलेन्सची समस्या होऊ शकते. यामुळे वजन वाढते.
ताणतणावामुळे गरजेपेक्षा जास्त खाल्ले जाते यामुळे वजन वाढू शकते.