Siddhi Hande
सध्या सोशल मीडियावर फक्त घिबली (Ghibli) या फीचरची चर्चा होत आहे. या फीचरचा वापर करुन सर्व जण आपले फोटो बनवत आहेत.
घिबली फीचर नक्की आहे तरी काय? याची सोशल मीडियावर चर्चा का होतेय?
ChatGpt च्या माध्यमातून वेगवेगळ्या विषयावर फोटो तयार करता येतात. कॉमिक्समधील अवताराचे फोटो बनवतात.
हे घिबली आर्ट कार्टुनसारखे दिसते. असे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
१९८५ मध्ये हायाओ मियाझाकी यांनी घिबली आर्टची सुरुवात केली. जपानी अॅनिमेशन स्टुडिओमध्ये ही सुरुवात केली.
घिबली या शब्दाचा अरबी भाषेत गरम, कोरडा वारा असा अर्थ होतो.
Open AI च्या माध्यमातून तुम्ही तुमच्या फोटोपासून घिबली स्टाइल फोटो बनवू शकतात.
यासाठी तुम्हाला ChatGpt ला सूचना (Prompt) द्यावी लागेल. याचसोबत तुमचा फोटो अपलोड करावा लागेल.
हे फीचर Open AI लाँच केलं. मात्र, तुम्ही काही लिमिटनंतर याचा मोफत वापर करु शकत नाही.
Next: सनरायजर्स हैदराबादची मालकीन काव्या मारणच्या 'या' गोष्टी माहीत आहेत का?