ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
सायली संजीव ही मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे.
सायली संजीवने आतापर्यंत अनेक मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केले आहे.
सायली संजीव आपल्या नावापुढेच कधीच आडनाव लावत नाही.
संजीव हे सायलीच्या वडिलांचे नाव आहे.
सायलीचे पूर्ण नाव सायली संजीव चांदसरकर आहे.
सायलीला आपल्या नावापुढे वडिलांचे नाव लावायचे होते त्यामुळे तिने आपल्या नावापुढे संजीव हे नाव लावले आहे.
सायली संजीव नेहमीच आपल्या हटके अंदाजाने चाहत्यांना भूरळ घालत असते.