ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
फ्रुट डाएट म्हणजेच फळांचा आहार. यामध्ये एखादी व्यक्ती अन्न सोडून देते आणि फक्त फळांचे सेवन करते.
वजन कमी करण्यासाठी फ्रुट डाएट केला जातो. यामुळे अतिरिक्त चरबी कमी होण्यास मदत होते.
फ्रुट डाएटमध्ये, हंगामी फळेच खावीत. यामध्ये तुम्हाला आवश्यक मिनरल्स आणि व्हिटॅमिन्स मिळतील. हे तुम्हाला बाजारात सहज मिळतील.
यामध्ये एका वेळी फक्त एकच फळ खावे. सर्व फळे मिसळून फळांचा चाट बनवून खाणे टाळावे. यामुळे तुम्हाला डाएट करण्याचा फायदा मिळत नाही.
फ्रुट डाएट सुरु करण्यासाठी तज्ञ्जांचा सल्ला घ्यावा. कारण तज्ञ तुम्हाला तुमच्या शरीराच्या गरजेनुसार योग्य फळे आणि तुम्ही किती दिवस हा आहार पाळावा हे सांगू शकतात.
बरेच लोक बेरी, टरबूज, नाशपाती यांसारखी फळांवर काळे मीठ घालून खातात पण हे आरोग्यासाठी हानिकारक असून मीठ घालून फळे खाणं टाळा.
जर तुम्हाला फ्रुट डाएटचा कंटाळ आला असेल तर तुम्ही फळांचे ज्यूस पिऊ शकता. परंतु यामध्ये साखर घालू नका.