Ankush Dhavre
रोहित शर्मा हा भारतीय वनडे आणि कसोटी संघाचा कर्णधार आहे.
रोहितने आपल्या क्रिकेट कारकीर्दीत अनेक रेकॉर्ड तोडले आणि बनवले देखील आहेत.
रोहित शर्मा किती शिकलाय आणि कोणत्या शाळेत शिकलाय माहीत आहे का?
रोहितने आपल्या शालेय शिक्षणाची सुरुवात नागपूरमधील एका शाळेतून केली होती.
त्यानंतर मुंबईला आल्यानंतर त्याने पुढील शिक्षण स्वामी विवेकानंद आंतरराष्ट्रीय शाळेतून घेतलं.
या शाळेत शिक्षण घेत असताना त्याचे प्रशिक्षक दिनेश लाड यांनी त्याला खूप मदत केली.
त्याने पुढील शिक्षण रिझवी कॉलेजमधून पूर्ण केलं.
१२ वी पास झाल्यानंतर त्याने संपूर्ण लक्ष क्रिकेटवर केंद्रित केलं.