ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह देशाच्या राजकारणातील मोठं नाव आहे.
अमित शाह यांच्याकडे गृह आणि सहकार या दोन मंत्रालयाचा कारभार आहे.
अमित शाह हे गृह मंत्रालयात अंतर्गत सुरक्षा, दहशतवादविरोधी कारवाया आणि जम्मू-काश्मीरमधील धोरणात्मक बदल यासारख्या महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत.
सहकार मंत्रालयातून ‘सहकार से समृद्धी’ या ध्येयाने सहकारी चळवळीला बळकटी देण्याचे काम करत आहेत.
अमित शाह यांचा जन्म २२ ऑक्टोबर १९६४ रोजी मुंबई येथे एका संपन्न गुजराती कुटुंबात झाला.
अमित शाह १६ व्या वर्षापर्यंत गुजरातमधील पैतृक गावी, मानसा येथे वास्तव्य केले. याच ठिकाणी त्यांनी प्राथमिक शिक्षण पूर्ण केले.
मानसा येथे प्राथमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर, अमित शहा यांचे कुटुंब अहमदाबादला स्थलांतरित झाले. त्यांनी मेहसाना येथे शालेय शिक्षण घेतले.
अमित शहा यांनी अहमदाबादच्या सी.यू. शहा महाविद्यालयातून बायोकेमिस्ट्रीमध्ये बी.एस्सी. पदवी प्राप्त केली.
शिक्षणानंतर त्यांनी काही काळ वडिलांचा प्लास्टिक पाईपचा व्यवसाय सांभाळला आणि शेअर मार्केट तसेच सहकारी बँकेतही काम केले.
अमित शहा यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जॉइन केला. येथूनच त्यांच्या राजकारणाची सुरुवात झाली.