Dead person PAN card: मृत्यूनंतर व्यक्तीच्या पॅन कार्डचं काय केलं जातं?

Surabhi Jayashree Jagdish

मृत्यू

एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्यांच्या पॅन कार्डचे (PAN Card) काय करायचं याबद्दल काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत

पॅन कार्ड सरेंडर करणं बंधनकारक?

नाही, मृत व्यक्तीचे पॅन कार्ड सरेंडर करणं कायदेशीररित्या बंधनकारक नाही आणि ते न केल्यास कोणताही दंड लागत नाही.

का करावं सरेंडर?

पॅन कार्ड हे एक महत्त्वाचे आर्थिक ओळखपत्र आहे. मृत्यूनंतर ते असेच ठेवल्यास त्याचा गैरवापर होण्याची शक्यता असतं

कधीपर्यंत ठेवायला हवं?

मृत व्यक्तीच्या नावावर असलेले सर्व आर्थिक व्यवहारपूर्ण होईपर्यंत पॅन कार्ड सोबत ठेवणे महत्त्वाचं आहे.

पॅन कार्ड सरेंडर करण्याची प्रक्रिया

मृत व्यक्तीच्या पॅन कार्डवर ज्या आयकर अधिकाऱ्याचे अधिकारक्षेत्र आहे, त्यांना एक अर्ज लिहा. या अर्जात मृत व्यक्तीचे पूर्ण नाव, पॅन क्रमांक, जन्मतारीख आणि मृत्यूची तारीख नमूद करा. यामध्ये पॅन कार्ड रद्द करण्याची विनंती स्पष्टपणे सांगा.

आवश्यक कागदपत्रं

मृत व्यक्तीच्या पॅन कार्डची प्रत, मृत्यू प्रमाणपत्र, तुमच्या ओळखीचा पुरावा, नात्याचा पुरावा किंवा कायदेशीर वारस प्रमाणपत्र ही कागदपत्र जोडावी.

पोस्टाने करा अर्ज

हा अर्ज आणि सोबतची कागदपत्रे संबंधित आयकर अधिकाऱ्याकडे सादर करा. तुम्ही हे पत्र पोस्टाने किंवा थेट आयकर कार्यालयात जाऊन सादर करू शकता

खात्री करा

पॅन कार्ड सरेंडर करण्यापूर्वी मृत व्यक्तीच्या नावावर कोणतीही थकबाकी किंवा आर्थिक व्यवहार प्रलंबित नाहीत याची खात्री करा.

हरणटोळ साप डोक्यावरच का चावा घेतो?

येथे क्लिक करा