ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
जेव्हा तुम्ही बाजारातून वेगवेगळे प्रोडक्टस खरेदी करता तेव्हा तुम्हाला काही त्या प्रोडक्टसवर सेवांसह गॅरंटी आणि वॉरंटी मिळते. परंतु या दोन्ही शब्दांचा अर्थ काय माहितीये का, जाणून घ्या.
बरेच लोक गॅरंटी आणि वॉरंटीमध्ये गोंधळतात आणि त्यांना दोघांमधील फरक समजत नाही. काही लोक गॅरंटी आणि वॉरंटीला एकच समजतात. परंतु दोघांमध्ये खूप फरक आहे.
गॅरंटी आणि वॉरंटी या दोन्हीचे फायदे घेण्यासाठी तुम्हाला GST बिल किंवा वॉरंटी-गॅरंटी कार्डची आवश्यकता असते.
गॅरंटीमध्ये जर तुमचे एखादे प्रोडक्ट खराब झाले तर कंपनी तुम्हाला त्याच्या जागी एक नवीन प्रोडक्ट देईल.
वॉरंटीमध्ये कंपनी तुमचा खराब झालेला माल किंवा प्रोडक्ट दुरुस्त करुन तुम्हाला परत करेल.
गॅरंटीमध्ये एक कालावधी निश्चित असतो. हा नंतर वाढवता येत नाही. या काळामध्येच तुम्हाला प्रोडक्ट बदली करुन मिळतो.
वॉरंटीमध्ये कालावधीनंतर ही पैसे देऊन या सेवेचा लाभ घेऊ शकता.