Manasvi Choudhary
डीप फेक एक सिंथेटिक टेक्नोलॉजी आहे. सध्या सगळीकडे डीप फेकची चर्चा सुरू आहे.
डीप फेक टेक्नॉलॉजीचा वापर करून एखाद्या व्यक्तीचा चेहरा आणि शरीर दुसऱ्या व्यक्तीसोबत जोडले जाते.
डीप फेकचा वापर करून तयार केले गेलेले फोटो अथवा व्हिडीओ पाहून तो खरा आहे की खोटा हे ओळखणं कठीण होते.
आर्टिफिशिअल इंटेलिजन्स ही टेक्नॉलॉजी डीप फेकमध्ये आहे. जी त्या व्यक्तीचा चेहरा आणि शरीराची रचना बदलते.
डीप फेकचा वापर करून अशापद्धतीने प्रतिमा तयार केली जाते की त्यामुळे व्यक्तीच खरी असल्याचे आपल्याला वाटते. खरं तर ते तसं नसतं.
डीपफेक तंत्रज्ञान जनरेटिव्ह अॅडव्हरायजेरियल नेटवर्कचा वापर करून व्यक्तीचा खोटा चेहरा लावून प्रतिमा तयार करते.
डीपफेक टेक्नॉलॉजीचा वापर करून व्यक्तीचा चेहरा तसेच हावभाव, आवाज, हालचालींमध्ये बदल करता येते.
सध्या डीप फेकचा वापर करून सेलिब्रिटींचे फोटो अथवा व्हिडीओ तयार केले जातात. ते सोशल मीडियावर व्हायरल होतात.
सध्या साऊथ अभिनेत्री रश्मिका मंदान्नासोबत असाच प्रकार घडला. तिचा डीप फेक व्हिडीओ खूपच व्हायरल झाला.
अँग्लो इंडिया गर्ल झारा पटेलच्या व्हिडीओला रश्मिकाचा चेहरा लावून तो व्हिडीओ व्हायरल करण्यात आला होता.