Manasvi Choudhary
लिंबू हे स्वयंपाकघरातील आयुर्वेदिक फळ आहे.
आरोग्यासाठी गुणकारी लिंबाचा वापर घरगुती उपाय म्हणून केला जातो.
जेवणाची चव वाढवण्यापासून ते शारीरिक व्याधीपासून सुटका होण्यासाठी लिंबाचा वापर होतो.
मात्र लिंबू कापण्याच्या पद्धतीवरून अनेकांना गोंधळ होतो. लिंबू नेमका कापायचा कसा?
सामान्यत: आपल्याला घरातील मोठ्या मंडळीकडून लिंबू आडवा कापण्याचं सांगितलं जातं.
लिंबाच्या आतील रचनेमुळे लिंबू आडवा कापण्याचा सल्ला दिला जातो.
लिंबू हा रसाळ फळ आहे यामुळेच लिंबू कापताना काळजी घेतली जाते.
लिंबू उभा कापल्याने त्यातील रस बाहेर पडू शकतो यामुळे लिंबू आडवा कापला जातो.