Surabhi Jayashree Jagdish
आपण दररोज मराठी बोलत असताना इंग्रजी अनेक इंग्रजी शब्दांचा वापर करतो.
यामध्ये आपण पेन, पेन्सिल, मोबाईल, टीव्ही तसंच कॉम्प्युटर अशा शब्दांचा वापर करतो.
मात्र याच रोजच्या वापरात असलेल्या इंग्रजी शब्दांना मराठी शब्द विचारला तर तो अनेकांना माहिती नसतो.
आज आम्ही तुम्हाला अशाच एका मराठी शब्दाबद्दल सांगणार आहोत.
धूम्रपान हे आरोग्यासाठी हानिकारक आहे. असं असूनही अनेकजण सिगारेट ओढतात.
मात्र सिगारेटला मराठीमध्ये काय म्हणतात तुम्हाला माहितीये का?
सिगारेटला मराठीत धूम्रशलाका किंवा धूम्रदांडिका असे शब्द वापरले जातात.