ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
सध्या भारत पाकिस्तान युद्ध सुरु आहे. जम्मू काश्मीर आणि सीमालगतच्या भागात सतत हल्ले होत आहेत.
सीमालगतच्या लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्यांना सुरक्षित राहण्यासाठी आवाहन केले जात आहे. ब्लॅक आउट केला जात आहे.
या युद्धाच्या परिस्थितीत नागरिक हे बंकरमध्ये जाऊन राहतात.
बंकर म्हणजे काय आणि ते कुठे असते हे तुम्हाला माहितीये का?
बंकर हे नागरिकांच्या किंवा लष्कराच्या सुरक्षेसाठी बनवले जाते.
घराच्या भूमिगत भागात असलेली एक जागा किंवा खोली. म्हणजे घराच्या खाली अंडरग्राउंडमधील एक बंद जागा.
जर तुम्ही बंकरमध्ये लपलात तर युद्धापासून वाचू शकतात. तिथे कोणाचीही नजर जाणार नाही.
भारतीय सैन्यदेखील बंकरचा वापर करतात. अनेक मौल्यवान वस्तू, बॉम्ब किंवा काही महत्त्वाचा गोष्टी बंकरमध्ये लपवल्या जातात.
स्वतः चे किंवा मौल्यवान वस्तूंचे संरक्षण करण्यासाठी बंकर बांधले जाते. तिथे या वस्तू ठेवाव्यात.