ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
हाडांच्या पेशी असामान्यपणे वाढू लागल्यावर हाडांचा कर्करोग होतो. यामुळे हाडं कमकुवत होतात.
जेनेटिक फॅक्टर, रेडिएशन एक्सपोजर आणि काही हाडांच्या आजारांमुळे हा कॅन्सर होण्याचा धोका वाढू शकतो.
हाडांचे कॅन्सर झाल्यावर शरीरात सुरुवातीला कोणती लक्षणे दिसतात, जाणून घ्या.
या कॅन्सरचे सर्वात सामान्य लक्षण म्हणजे सतत आणि हळूहळू हाडांचे दुखणे वाढणे, जे विश्रांती घेतल्यानंतरही कमी होत नाही.
प्रभावित भागात सूज, गाठी किंवा कडकपणा हा हाडांच्या कॅन्सरचे लक्षण असू शकतो.
कॅन्सर हाडे कमकुवत करतो, ज्यामुळे किरकोळ दुखापत झाली तरी फॅक्चर होऊ शकते.
हाडांचे कॅन्सर असल्यास थकवा, अशक्तपणा आणि कोणत्याही कारणाशिवाय अचानक वजन कमी होणे अशी लक्षणे देखील दिसून येतात.