ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
मेटाबॉलिजम शरीरातील कॅलरीज लवकर बर्न करण्यास मदत करते. यामुळे शरीर निरोगी राहणयास मदत होते.
प्रोटीन आणि फायबरने समृद्ध असलेले बदाम मेटाबॉलिजम रेट वाढवतात. तुम्ही बदाम भिजवून किंवा असेच देखील खाऊ शकता.
ग्रीन टीमध्ये अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात आढळतात. यामुळे मेटाबॉलिजम रेट वाढतो.
दालचिनी इन्सुलिन प्रतिरोध कमी करते आणि मेटाबॉलिजम रेट सुधारते.
पालक आयरन आणि मॅग्नेशियम समृद्ध असल्याने, थकवा कमी होतो. याचा आहारात समावेश करा.
रताळ्यामध्ये फायबर आणि व्हिटॅमिन ए जास्त प्रमाणात असतात, यामुळे शरीराला उर्जा प्रदान होते.
आल्याचे सेवन केल्याने शरीरातील मेटबॉलिज रेट वाढण्यास मदत होते.