ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
अनेकांना नाश्त्यासाठी डोसा किंवा चिला बनवायला आवडतं. परंतु डोसा तव्यावर चिकटल्याने डोसा खराब होतो आणि पीठ वाया जाते.
परफेक्ट डोसा बनवण्यासाठी तुम्ही या सोप्या टिप्स वापरु शकता.
सर्वप्रथम डोसाचे पॅन गरम करा, त्यात मीठ घाला आणि ते सर्वत्र पसरवा.
जेव्हा मिठाचा रंग बदलेल तेव्हा कापडाने पॅनमधून मीठ स्वच्छ करा.
आता तव्यावर थोडे तेल पसरवा आणि तेल गरम झाल्यावर पुन्हा थोडे मीठ घाला.
पुन्हा कापडाने पॅन पुसून टाका आणि त्यावर थोडे तेल लावा.
आता डोसा किंवा चिल्याचे पीठ तव्यावर पसरवा, ते अजिबात चिकटणार नाही.