ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
धुळे जिल्ह्यात फिरण्यासाठी अनेक ऐतिहासिक, प्रसिद्ध आणि सुंदर ठिकाणं आहेत.
धुळ्यामध्ये तुम्ही ऐतिहासिक किल्ले, कोसळणारे सुंदर धबधबे आणि वन्यजीव अभयारण्याला भेट देऊ शकता.
जर तुम्ही इतिहासप्रेमी किंवा निसर्गप्रेमी असाल तर या किल्ल्याला आवर्जून भेट द्या.
हिरवळीने वेढलेला हा धबधबा शांतता आणि सुंदरतेचा अनुभव देतो. पिकनिकसाठी हे परफेक्ट ठिकाण आहे.
समुद्रसपाटीपासून २५०० मीटर उंचीवर असलेला हा किल्ला गिरीदुर्ग किल्ला म्हणून देखील ओळखला जातो. येथे तुम्ही ट्रेकिंगचा आनंद घेऊ शकता.
शिरपूर तालुक्यातील अनेर नदीजवळ हे वन्यजीव अभयारण्य आहे. येथे कोल्हे, लांडगे, अस्वल, ससे, मोर, गिधाडे आणि हॉर्नबिल अशा विविध प्राण्यांच्या प्रजाती आढळतात. जर तुम्ही प्राणीप्रेमी असाल तर येथे नक्की भेट द्या.
लळिंग किल्ल्याजवळ असलेला हा धबधबा पिकनिकसाठी एक लोकप्रिय ठिकाण आहे. नैसर्गिक सौंदर्याने परिपूर्ण असलेल्या या धबधब्याला नक्की भेट द्या.