Bharat Jadhav
तुळशीला हिंदू धर्मात अत्यंत पवित्र मानले जाते आणि देवी लक्ष्मीचे रूप म्हटले जाते.
तुळशीजवळ तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा दिवा लावल्याने घरात सकारात्मक ऊर्जा येते. यामुळे कौटुंबिक जीवनात सुख-शांती कायम राहते.
तुळशी मातेला लक्ष्मीचे रूप मानले जाते, त्यामुळे तुळशीजवळ दिवा लावल्याने आर्थिक अडथळे दूर होतात आणि घरात आर्थिक समृद्धी येत असते.
जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत ग्रह दोष असतील तर तुळशीसमोर दिवा लावल्याने या दोष कमी होतात. तसेच घरातील वास्तू दोष दूर होतात.
तुळशीजवळ दिवा लावल्याने पितृदोष दूर होऊन पितरांची कृपा होते. कार्तिक महिन्यात तुळशीची पूजा केल्याने पितरांना शांती मिळते.
तुळशीजवळ दिवा लावल्याने वैवाहिक जीवनातील अडथळे दूर होतात. वैवाहिक जीवन मधुर होऊ शकते.