Plane Crash : विमानाचा ब्लॅक बॉक्स म्हणजे काय? याद्वारे अपघाताची माहिती कशी मिळते?

Surabhi Jayashree Jagdish

ब्लॅक बॉक्स

विमान अपघाताची माहिती मिळवण्यासाठी ब्लॅक बॉक्स हे एक अत्यंत महत्त्वाचे उपकरण आहे.

दोन उपकरणं

यापैकी दोन उपकरणं आहेत. यातील एक कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर आणि फ्लाइट डेटा रेकॉर्डर.

फ्लाइट डेटा रेकॉर्डर

हा विमानाशी संबंधित तांत्रिक माहिती रेकॉर्ड करतो. विमानाचा वेग, उंची, दिशा तसंच इंजिनची माहिती याद्वारे मिळते.

नियंत्रण सेंटिग्ज

याशिवाय वैमानिकांनी कोणती नियंत्रणे वापरली होती, कॉकपिट आणि बाहेरील तापमान व दाब, विमानात कोणतेही असामान्य कंपन होते का, ऑटोपायलट कधी चालू होता किंवा बंद होता याची माहितीही मिळण्यास मदत होते.

कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर

हा कॉकपिटमधील आवाज आणि संभाषणे रेकॉर्ड करतो. यावेळी वैमानिक एकमेकांशी आणि एअर ट्रॅफिक कंट्रोलशी काय बोलत होते आणि इंजिनचा आवाज, स्विच दाबण्याचे आवाज, अलार्म आणि इतर असामान्य आवाज रेकॉर्ड होतात.

अपघातानंतर शोध

विमान अपघातानंतर ब्लॅक बॉक्स शोधणं हे सर्वात महत्त्वाचे काम असतं. जर विमान समुद्रात कोसळलं तर ब्लॅक बॉक्समध्ये एक बिकन किंवा सिग्नल असतो, जो 30 ते 90 दिवसांपर्यंत अल्ट्रासाउंड सिग्नल पाठवतो.

माहिती

ब्लॅक बॉक्स सापडल्यानंतर, तो प्रयोगशाळेत पाठवला जातो. त्या ठिकाणी विशेष उपकरणांचा वापर करून त्यातील डेटा काढला जातो.

Marathi History: 'पेशव्यांची पेशवाई खाण्यात गेली' असं का म्हटलं जातं?

येथे क्लिक करा