Amrit Bharat Station: अमृत ​​भारत स्टेशन नक्की कुठे आहे स्टेशनमधील स्मार्ट सेवा आणि सुविधा जाणून घ्या

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

रेल्वे स्थानकांचे उद्घाटन

पंतप्रधान मोदींनी १८ राज्यांतील १०३ अमृत भारत रेल्वे स्थानकांचे व्हर्च्युअल उद्घाटन केले, देशभरातील रेल्वे सुविधांमध्ये आधुनिकतेचा टप्पा सुरू केला.

खास का आहे?

केंद्र सरकारने २०२१ साली अमृत भारत स्टेशन योजना सुरू केली असून, या अंतर्गत १३०० पेक्षा जास्त रेल्वे स्थानकांचे नुतनीकरण करण्यात येणार आहे.

स्टेशन कसे आहे?

या योजनेत रेल्वे स्थानक स्वच्छ, आधुनिक व तांत्रिकदृष्ट्या प्रगत करण्यात येणार असून प्रतीक्षालय, शौचालय, दरवाजे व छत यांचे नुतनीकरणही होणार आहे.

कोणते सुविधा आहेत?

अमृत भारत स्टेशनवर लिफ्ट, एस्केलेटर, मोफत वायफाय सुविधा मिळणार असून प्रवाशांसाठी दिशादर्शक इंडिकेटरही बसवले जातील, जे प्रवास सुलभ करतील.

एक्झिक्युटिव्ह लाउंज

अमृत भारत स्टेशनवर एक्झिक्युटिव्ह लाउंजसह व्यावसायिक बैठकींसाठी स्वतंत्र आणि सुसज्ज जागा तयार करण्याची योजना आखण्यात आली आहे, जी सुविधा वाढवेल.

कुठे आहे?

गुजरातमधील गांधीनगर रेल्वे स्थानक हे अमृत भारत योजनेत पहिले आधुनिक स्थानक ठरले असून, येथे पाचतारांकित दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

भोपळमध्ये देखील आहे

हबीबगंज रेल्वे स्टेशनचे नाव बदलून राणी कमलापती ठेवण्यात आले असून, ते अमृत भारत योजनेअंतर्गत आधुनिक पद्धतीने विकसित करण्यात आले आहे.

NEXT: भारताचा सर्वात लांब रेल्वे प्रवास! प्रवासाला लागतो ३ दिवसांपेक्षा अधिक काळ, जाणून घ्या

येथे क्लिक करा