Rain Health Tips: पावसात भिजल्यानंतर कोणते आजार होऊ शकतात?

Surabhi Jayashree Jagdish

त्वचेवर खाज, संसर्ग

पावसाच्या घाणेरड्या पाण्याच्या संपर्कात आल्याने त्वचेवर खाज, लालसरपणा किंवा पुरळ येण्याची शक्यता असते. ओलसर वातावरणामुळे बुरशीची वाढ वेगाने होते आणि फंगल इन्फेक्शनचा धोका वाढतो.

Rainwater Infection | saam tv

सर्दी, खोकला आणि ताप

जास्त वेळ पावसात भिजल्यामुळे शरीराचं तापमान कमी होऊ शकते आणि त्यामुळे सर्दी, खोकला किंवा तापाची समस्या निर्माण होऊ शकते. विशेषतः आधीपासून आजारी असलेल्या किंवा लहान मुलांमध्ये हा धोका अधिक असतो.

Skin Infection | saam tv

डोळे आणि कानाचा संसर्ग

पावसाच्या दूषित पाण्यामुळे डोळ्यांमध्ये जळजळ, लालसरपणा किंवा संसर्ग होऊ शकतो. कानात पाणी साचल्यास कानदुखी किंवा कानाच्या संसर्गाचा त्रास होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे भिजल्यानंतर डोळे आणि कान स्वच्छ ठेवण्याची काळजी घ्यावी.

Fungal Infection | saam tv

रोगप्रतिकारक शक्ती

ज्या व्यक्तींची रोगप्रतिकारक शक्ती कमी असते त्यांना पावसाळ्यात विविध संसर्ग होण्याचा धोका अधिक असतो. अशा व्यक्तींमध्ये व्हायरल किंवा बॅक्टेरियल संसर्गाची शक्यता तुलनेने जास्त असते. त्यामुळे त्यांनी पावसात जास्त वेळ भिजणं टाळावं.

Rash | saam tv

स्वच्छ अंघोळ

पावसात भिजल्यानंतर शक्य तितक्या लवकर स्वच्छ पाण्याने अंघोळ करावी. यामुळे त्वचेवर चिकटलेली घाण, जीवाणू दूर होण्यास मदत होते. त्यानंतर स्वच्छ आणि कोरडे कपडे घातल्याने संसर्गाचा धोका कमी होतो.

Itchy Skin | saam tv

लक्षणं

पावसात भिजल्यानंतर ताप, त्वचेवर पुरळ, तीव्र खाज किंवा इतर त्रास सुरू झाल्यास दुर्लक्ष करू नये. ही लक्षणे संसर्गाची सुरुवात असू शकतात आणि वेळेवर उपचार घेणं महत्त्वाचं असतं.

Viral Infection | saam tv

योग्य खबरदारीही घ्या

पावसात भिजणं अनेकांना आवडतं परंतु जास्त वेळ पावसात राहणं आरोग्यासाठी योग्य नाही. शक्यतो पावसात दीर्घकाळ भिजणं टाळावं आणि घरी आल्यावर शरीर स्वच्छ करून कोरडं ठेवावं. योग्य काळजी घेतल्यास पावसाचा आनंदही घेता येतो.

Bacterial Infection | saam tv

Heart attack symptoms: 1 महिना अगोदर ही 5 लक्षणं दिसली तर समजा हार्ट अटॅक येणारे!

Chest pain | saam tv
येथे क्लिक करा