Saam Tv
उन्हाळ्यात तिखट, मसालेदार जेवण खाल्याने पोटात जळजळ होऊ शकते.
पोटात गॅस, अपचानाच्या समस्या, पोट दुखी अशा समस्यांना तुम्ही सामोरे जात जात असाल तर ही माहीती तुमच्यासाठी आहे.
तुम्ही या समस्यांनी वैतागला असाल तर तुम्हाला काही सोपे आणि घरगुती उपाय खूप फायदेशीर ठरतील.
उन्हाळ्यात जमेल तितकं पाणी तसेच नारळ पाणी सेवन करा. त्याने शरीरातील ऊर्जा कमी होते.
उन्हाळ्यात फार चवीष्ठ आणि तिखट पदार्थ खात असाल तर एक ग्लास ताक सेवन करायला विसरू नका.
ताक सेवन केल्याने पचनक्रिया सुधारते आणि जळजळ सुद्धा त्वरित कमी होते.
तुम्ही घरात पिण्याच्या भांड्यात पुदीना टाकून ठेवू शकता. त्याने पोटातली आग कमी होते.
उन्हाळ्यात गरम दूध पिणं टाळावं. तर थंड दूध सेवन करावे.
दूधाने शरीराला प्रचंड पोषक तत्वे मिळतात. तसेच शरीरातील गरमी कमी होते.