ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
अनेकांना मसालेदार पदार्थ खायला आवडतात. काही लोक जेवताना हिरवी मिरची देखील खातात.
जास्त मसालेदार अन्न खाणे आरोग्यासाठी हानिकारक असू शकते.
आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की, जास्त मसालेदार पदार्थ खाल्ल्याने शरीरात कोणते बदल दिसून येतात.
उन्हाळ्यात जास्त मसालेदार पदार्थ खाल्ल्याने छातीत जळजळ होऊ शकते.
मसालेदार अन्नामुळे गॅस आणि अपचन सारख्या समस्या देखील उद्भवू शकतात.
जर तुम्ही गरजेपेक्षा जास्त मसालेदार पदार्थ खाल्ल्याने तोंडात जळजळ होऊ शकते.
जर तुम्ही जास्त प्रमाणात मसालेदार पदार्थ खाल्ले तर तुम्हाला अतिसाराची समस्या होऊ शकते.