ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
रक्त आपल्या शरीरात महत्त्वाची भूमिका बजावते. ते आपल्या शरीराच्या प्रत्येक भागाला ऑक्सिजन आणि पोषक तत्वे पोहोचवण्याचे काम करते.
आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की, जर शरीरात चुकीच्या ब्लड ग्रुपचे रक्त चढवले गेले तर काय परिणाम होऊ शकतो, जाणून घ्या.
ब्लड ग्रुपचे A+, AB+, B+, O+, AB-, A-, B-, O- असे वेगवेगळे प्रकार असतात. यापैकी काही रक्तगट खूप दुर्मिळ आहेत.
जर शरीरात चुकीच्या रक्तगटाचे रक्त चढवले गेले तर रक्तामध्ये रिएक्शन होऊ शकते. ज्यामुळे एखादी व्यक्ती गंभीर आजाराला बळी पडू शकते.
कधीकधी योग्य रक्तगटाचे रक्त चढवल्यावरही अॅलर्जी होऊ शकते. यामुळे सूज येणे किंवा श्वास घेण्यासही त्रास होऊ शकतो.
कधीही ब्लड ट्रान्यफ्यूजन करण्यासाआधी डॉक्टर रुग्णांचे ब्लड टेस्ट करतात जेणेकरुन रुग्णाला योग्य रक्त चढवले जाऊ शकेल.
शरीरात रक्ताची कमतरता निर्माण होऊ नये यासाठी आयरनयुक्त पदार्थांचे सेवन करा. तुम्ही डाळिंब किंवा बीटचे सेवन करु शकता.