ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
अस्थमा ही श्वसनसंस्थेशी संबंधित समस्या आहे, ज्यामुळे श्वास घेण्यास त्रास होणे, छातीत जडपणा येणे आणि खोकला यासारख्या समस्या उद्भवू शकतात.
अस्थमा असल्यास शरीरात काही संकेत देत असतं, ही लक्षणे कोणती, जाणून घ्या.
रात्री किंवा सकाळी सतत खोकला येणे हे अस्थमाची सुरुवातीची लक्षणे आहेत.
अस्थमाच्या रुग्णांना श्वास घेताना शिटी सारखा आवाज ऐकू येऊ शकतो. याला व्हिजिंग म्हणतात.
अस्थमाच्या रुग्णाला पायऱ्या चढताना किंवा वेगाने चालताना श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो. त्यांना पूर्ण श्वास त्रास होऊ शकतो.
अस्थमामुळे छातीत जडपणा किंवा जडपणाची भावना येऊ शकते. व्यायाम, थंड हवा किंवा धूळ यासारख्या ट्रिगर्सच्या संपर्कात आल्याने हे लक्षण आणखी बिकट होऊ शकते.
धूळ, धूर आणि प्रदूषणापासून दूर रहा, थंड हवा किंवा तीव्र वास टाळा आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार नियमितपणे इनहेलर वापरा.