Surabhi Jayashree Jagdish
आतापर्यंत पाल हा कीटक तुम्ही कधीनाकधी तरी पाहिला असेल.
काही लोकांना या पालीची भीती तर काहींना याची किळस वाटते.
असं मानलं जातं की, पाल ही विषारी असते.
पण तुम्ही कधी विचार केला आहे का की, पाल चावल्यानंतर काय होऊ शकतं?
पाल चावल्यानंतर कोणाचाही मृत्यू होऊ शकत नाही मात्र संबंधित व्यक्तीला इन्फेक्शन होण्याचा धोका असतो.
यामुळे वेदना, जळजळ, खाज येणं, सूज येणं या समस्या उद्धभवतात.
काही जातीच्या पाली विषारी असतात. या पालींना चावा घेतल्यास श्वास घेण्यामध्ये त्रास होऊ शकतो.