Manasvi Choudhary
आहारात भात अत्यंत महत्वाचा आहे. भात खाल्ल्याशिवाय अनेकांचे जेवण पूर्ण होत नाही. सकाळी आणि सायंकाळी दोन्ही वेळी आहारात भाताचा समावेश असतो.
परंतु, आजकाल अनेक डाएट प्रेमी आरोग्याच्या काळजीसाठी भात खाणे सोडतात. जर १५ दिवस भात खाणे सोडलं तर नेमके कोणते बदल होतात तुम्हाला माहितीये असायला हवेत.
भात खाणे बंद केल्यावर शरीराला मिळणाऱ्या कॅलरीजचे प्रमाण अचानक कमी होते. तसेच भातामध्ये असणारे 'वॉटर वेट' निघून जाते, ज्यामुळे वजन आणि पोटाची चरबी कमी होते.
भाताचा ग्लायसेमिक इंडेक्स उच्च असतो, ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी वेगाने वाढते. भात बंद केल्याने इन्सुलिन लेव्हल सुधारते आणि डायबिटीसच्या रुग्णांना मोठा फायदा होतो.
जेवणानंतर अनेकदा भात खाल्ल्यामुळे आळस किंवा सुस्ती येते. कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण कमी झाल्याने शरीर हलके वाटते आणि दिवसभर अधिक ऊर्जा येते.
अनेक लोकांना रात्रीचा भात खाल्ल्यावर अपचन किंवा पोट फुगण्याचा त्रास होतो. भात खाणं सोडल्याने पोटाचे आरोग्य सुधारते आणि बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते.