Late Night Sleeping Side Effects: सावधान! तुम्हीही रात्री उशिरा झोपताय? हार्मोन्सपासून मेंदूपर्यंत शरीरात होतात 'हे' 5 त्रासदायक बदल

Manasvi Choudhary

उशिरा झोपण्याची सवय

अनेकांना रात्री उशिरा झोपण्याची सवय असते. नियमितपणे रात्री उशिरा झोपल्याने केवळ आरोग्यावरच नाही तर मानसिकतेवर देखील परिणाम होतो.

Late Night Sleeping Side Effects

आरोग्यासह मानसिकतेवर होतो परिणाम

मोबाईल स्क्रोल करणे, मालिका पाहणे किंवा रात्री लेटपर्यंत काम करणे ही रात्री उशिरा झोपण्याची मुख्य कारणे आहेत मात्र यामुळे तुमच्या आरोग्यासह मानसिकतेवर परिणाम होतो हे लक्षात घेणे महत्वाचे आहे.

Late Night Sleeping Side Effects

हार्मोन्स ते मानसिक संतुलन

आरोग्य तज्ञांच्या मते, उशिरा झोपल्याने हार्मोन्स पासून ते मानसिक आरोग्यापर्यंत सर्वच गोष्टींमध्ये नकळतपणे बदल होतो. यामुळे झोपण्याची वेळ न पाळल्याने शरीरात कोणते बदल होतात ते या वेबस्टोरीतून जाणून घेऊया.

late night sleep

हार्मोन्सवर परिणाम

मानवी शरीर हे घड्याळाप्रमाणे सतत सुरू असते. जेव्हा तुम्ही रात्री उशिरापर्यंत जागे राहता तेव्हा ही लय विस्कळत होते ज्यामुळे तुमच्या शरीराला कधी विश्रांती घ्यावी आणि कधी झोपावे हे समजत नाही आणि यामुळे हार्मोन्सवर परिणाम होतो.

hormone Changes

मेंदूच्या कार्यात अडथळा

उशिरा झोपल्याने मेंदूवर परिणाम होतो. तुम्ही ज्यावेळेस विश्रांती घेता तेव्हा मेंदू शरीरातील विषारी घटक बाहेर टाकतो. चेतासंस्थेतील जोडण्या मजबूत करतो. मात्र जेव्हा तुम्ही झोप टाळता तेव्हा ही प्रक्रिया होत नाही त्यामुळे मेंदूच्या कार्यात अडथळा येऊ शकतो.

Braon Problem

एकाग्रता होते कमी

साधारणपणे मानवासा नियमितपणे सहा तासांची झोप आवश्यक असते मात्र काही लोक कमी तास झोपतात यामुळे एकाग्रता कमी होते.

एकाग्रता होते कमी | yandex

या समस्या उद्भवतात

रात्री उशिरा झोपण्याचा परिमाम कॉर्टिसोल, मेलटोनिन आणि इन्सुलिन यासांरख्या हार्मोन्सवर होतो यामुळे मधुमेह, वजन वाढणे, पोटाच्या समस्या उद्भवू शकतात.

late night sleep

हृदयविकाराचा धोका वाढतो

अनियमित झोपेच्या सवयींमुळे हृदयाच्या समस्या जाणवू लागतात. उच्च रक्तदाब आणि वाढलेले कोलेस्ट्रोल यामुळे हृदयविकाराचा झटक येण्याची शक्यता अधिक असते.

Heart attack

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

Health Tips | Canva

Next : Tamilnadu Tourism: तमिळनाडूमधील प्रसिद्ध 5 हिल स्टेशन; एकदा गेलात की परत यावेसे वाटणार नाही

येथे क्लिक करा..