Manasvi Choudhary
आजकाल अनेक डाएटप्रेमी आरोग्याच्या काळजीसाठी साखर खाणे सोडतात. साखर आरोग्यासाठी घातक असल्याचे मानले जाते.
परंतु, जेव्हा तुम्ही साखर खाणे सोडता, तेव्हा शरीरावर नेमका काय परिणाम होतो? वजन कमी होते की वाढते? याविषयी समजून घ्या.
जेव्हा तुम्ही नियमितपणे साखर खात असता आणि अचानक साखर बंद करता, तेव्हा मेंदूला साखरेचा पुरवठा न झाल्याने 'शुगर विड्रॉवल' लक्षणे दिसतात. यामुळे सुरुवातीच्या ३ ते ७ दिवसांत तीव्र गोड खाण्याची इच्छा होते आणि चिडचिड होऊ शकते.
साखरेच्या सेवनाने शरीरातील ऊर्जा पातळी सतत वर-खाली होत असते. साखर खाणे सोडल्यास शरीराला या नवीन बदलाशी जुळवून घेण्यासाठी थोडा वेळ लागतो, ज्यामुळे सुरुवातीला रात्री झोप न येणे किंवा वारंवार जाग येणे अशा समस्या जाणवू शकतात.
साखर सोडल्याने प्रामुख्याने वजन कमीच होते. साखर हे वजन वाढण्याचे मुख्य कारण असते. जेव्हा तुम्ही साखरेचे पदार्थ बंद करता, तेव्हा दैनंदिन कॅलरीजचे प्रमाण खूप कमी होते. यामुळे शरीरातील साचलेली अतिरिक्त चरबी बर्न होण्यास सुरुवात होते आणि वजन नियंत्रणात येते.
साखर बंद केल्याने रक्तातील साखरेची पातळी स्थिर राहते. यामुळे इन्सुलिनचा ताण कमी होऊन मेटाबॉलिझ्म वेगाने काम करू लागतो, ज्यामुळे थकवा कमी होऊन दिवसभर ताजेतवाने वाटते.
साखरेमुळे चेहऱ्यावर मुरुम आणि सुरकुत्या येण्याचा धोका असतो. साखर सोडल्यास अवघ्या काही आठवड्यांत त्वचेची चमक वाढते आणि पोटातील जळजळ व अपचनाचा त्रास दूर होतो
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.