Manasvi Choudhary
अनेकदा आपण जेवत असताना, पाणी पिताना किंवा अगदी सहज बसलो असताना अचानक आपल्याला उचकी लागते.
उचकी लागल्यानंतर काही सेकंदांत किंवा मिनिटांत ती थांबते, पण कधीकधी ती बऱ्याच वेळ राहू शकते. अशावेळी त्यामागील प्रक्रिया समजून घ्या.
आपल्या छाती आणि पोटाच्या पोकळीl 'डायाफ्राम' नावाचा एक महत्त्वाचा स्नायू असतो, जो श्वासोच्छ्वास घेण्यासाठी मदत करतो. जेव्हा या स्नायूमध्ये अचानक अनैच्छिक आकुंचन होते, तेव्हा हवेचा लोट वेगाने फुफ्फुसांत शिरतो. यामुळे हवेचा मार्ग अचानक ब्लॉक होऊन तोंडातून 'हिक' आवाज बाहेर पडतो
सोडा किंवा कोल्ड ड्रिंक्स अति प्रमाणात प्यायल्याने पोटात गॅस तयार होऊन उचकी येऊ शकते.
अचानक खूप जास्त आनंद होणे, भीती वाटणे, चिंता किंवा मानसिक ताण यामुळे देखील मज्जातंतू उत्तेजित होऊन उचकी येऊ शकते.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.