Manasvi Choudhary
आजकाल धकाधकीच्या जीवनशैलीमुळे चिंता म्हणजेच एंग्झायटी अटॅकचा धोका वाढलेला आहे. ही चिंता केवळ मानसिक थकवा नाही तर शरीराच्या अंतर्गत परिणाम दायक ठरू शकते.
झोप न लागणे, पचनाच्या समस्या, थकवा आणि चिडचिडेपणा ही एंग्झायटी अटॅकची मुख्य लक्षणे आहेत.
एंग्झायटी अटॅक हा तुम्ही जेव्हा खूप जास्त विचार करता. त्यावर नियंत्रण ठेवू शकत नाही तेव्हा समस्या अधिक धोकादायक ठरते.
एंग्झायटी अटॅक हा अनेकदा कोणत्याही स्पष्ट दिसणाऱ्या कारणाशिवाय नाही तर मनात सुरू असलेल्या विचांरामुळे उद्भवतो.
तुम्ही सतत चिंतेत राहत असाल तर याचा परिणाम हृदय आणि रक्तवाहिन्या समस्यांशी असतो ज्यामुळे हृदयविकार हृदयविकाराच झटका आणि उच्च रक्तदाब या आजारांचा धोका वाढू शकतो.
एंग्झायटीमुळे पचनक्रियेवर देखील परिणाम होतो. अल्सर, मळमळ, अतिसार, बद्धकोष्ठता या समस्या निर्माण होतात.
शरीराची रोगप्रतिकारशक्ती देखील कमकुवत होते ज्यामुळे झोप न येणे, डोकेदुखी, अंगदुखी वाढते.
सतत चिंतेत राहिल्याने नैराश्य आणि पोटात आम्ल तयार होणे यासमस्या होण्याची शक्यता अधिक असते.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.