दात घासण्याचा ब्रश कधीच बदलला नाही तर काय होईल?

Surabhi Jayashree Jagdish

दात घासण्याचा ब्रश

दात घासण्याचा ब्रश (toothbrush) नियमितपणे बदलावा असा सल्ला तज्ज्ञ आपल्याला देतात.

न बदलणे

न बदलल्यास तुमच्या दातांच्या आणि हिरड्यांच्या आरोग्यासाठी अनेक गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात.

दात स्वच्छ होणार नाहीत

साधारणपणे २-३ महिन्यांच्या वापरानंतर ब्रशचे ब्रिसल्स (दात) वाकतात, तुटतात. यामुळे ते दातांच्या पृष्ठभागावरील आणि फटींमधील प्लेक (Plaque) प्रभावीपणे काढू शकत नाहीत.

हिरड्यांना इजा

खराब ब्रिसल्समुळे हिरड्यांवर अनावश्यक दाब येतो. यामुळे हिरड्यांना सूज (Gingivitis) येऊ शकतं, त्यातून रक्त येऊ शकतं.

इन्फेक्शन

दात पूर्णपणे साफ न झाल्याने हिरड्यांच्या आजारांचा धोका वाढतो. ज्यामुळे हिरड्यांना इन्फेक्शन होऊन दात पडू शकतात.

बुरशीची वाढ

प्रत्येक वेळी दात घासल्यावर ब्रशवर तोंडातील जिवाणू, विषाणू आणि बुरशी जमा होतात. ओलसर वातावरणामुळे ब्रशच्या ब्रिसल्समध्ये या सूक्ष्मजीवांची वाढ होते.

ब्रश कधी बदलावा?

दर २ ते ३ महिन्यांनी किंवा ब्रिसल्स खराब झाल्यास ब्रश बदलला पाहिजे.

हरणटोळ साप डोक्यावरच का चावा घेतो?

येथे क्लिक करा