Surabhi Jayashree Jagdish
रात्रभर फोन चार्जिंगला लावून ठेवणं ही आजकाल अनेकांची सवय झालीये. सोयीसाठी लोक झोपताना फोन चार्जिंगला जोडून ठेवतात. आधुनिक स्मार्टफोनमध्ये ओव्हरचार्जिंगपासून संरक्षण करणारे फीचर्स असतात. तरीही चुकीच्या पद्धतीने चार्जिंग केल्यास बॅटरीच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो.
आधुनिक स्मार्टफोनमध्ये ओव्हरचार्जिंग रोखण्यासाठी सुरक्षा फीचर्स दिलेले असतात. बॅटरी 100% झाल्यावर फोन चार्जिंग थांबवतो. त्यामुळे लगेच मोठं नुकसान होत नाही. तरीही सतत चार्जर जोडून ठेवणं पूर्णपणे सुरक्षित नाही.
फोन पूर्ण चार्ज झाल्यानंतरही तो प्लगमध्ये राहिला तर बॅटरीवर ताण येतो. हा ताण दीर्घकाळात बॅटरीची क्षमता कमी करू शकतो. बॅटरी लवकर डाऊन होण्याची शक्यता वाढते.
रात्रभर चार्जिंगमुळे फोन गरम होण्याची शक्यता वाढते. अधिक उष्णता बॅटरीच्या सेल्सना नुकसान पोहोचवू शकते. ही उष्णता बॅटरीचं आयुष्य कमी करणारा प्रमुख घटक आहे. त्यामुळे फोन थंड ठेवणं महत्त्वाचं असतं.
वारंवार दीर्घ वेळ चार्जिंगला ठेवलं तर बॅटरीची कार्यक्षमता कमी होते. फोन लवकर डिस्चार्ज होऊ लागतो. एकदा चार्ज केल्यानंतर बॅकअप कमी मिळतो. हे बदल हळूहळू दिसून येतात.
कमी दर्जाचे किंवा नकली चार्जर वापरल्यास बॅटरीला धोका निर्माण होतो. अशा चार्जरमुळे व्होल्टेज योग्य मिळत नाह. त्यामुळे बॅटरी गरम होते किंवा खराब होते शक्य असते.
चार्जिंग करताना फोन उशी किंवा चादरीखाली ठेवू नये. अशा ठिकाणी उष्णता बाहेर पडू शकत नाही. त्यामुळे फोन अधिक गरम होतो. नेहमी हवेशीर ठिकाणी चार्जिंग करणं योग्य आहे.