Sprouted Potato And Onion: कोंब आलेले बटाटे आणि कांदे खाल्ले तर काय होते?

Dhanshri Shintre

सोलानाईन

कोंब आलेल्या बटाट्यात सोलानाईन नावाचे विषारी घटक जास्त प्रमाणात असतात.

कोंब आणि हिरवा भाग

हिरव्या बटाट्यांमध्ये सोलानाईनचं प्रमाण जास्त असतं, म्हणून खाण्यापूर्वी त्यावरील कोंब आणि हिरवा भाग काढून टाका.

सुरकुत्या पडलेले

जुने पण बुरशी न लागलेले बटाटे खाण्यायोग्य असतात. पण जास्त सुरकुत्या पडलेले किंवा मोठे कोंब असलेले बटाटे टाळा.

कोणते आजार होतात?

सोलानाईनमुळे अतिसार, उलट्या आणि तीव्र पोटदुखी होऊ शकते, गंभीर प्रकरणांमध्ये गुंगी येऊ शकते, डोळ्यांसमोर अंधारी येऊ शकते.

बुरशी

कोंब आलेले कांदे आणि लसूण सामान्यतः खाण्यास सुरक्षित असतात, पण त्यावर बुरशी वाढल्याने दुर्गंधी येत असेल तर ते टाकून द्या.

कोरड्या जागेत ठेवा

कांदे-बटाटे, लसूण थंड आणि कोरड्या जागेत ठेवा म्हणजे कोंब येणार नाही.

वेगळे ठेवा

बटाटे आणि कांदे वेगळे ठेवा जेणेकरून त्यांना कोंब येणार नाही.

NEXT: तुम्ही कॉर्न कसे खाताय? भाजलेलं की उकडलेलं, कोणता पर्याय आहे अधिक फायदेशीर?

येथे क्लिक करा