Dhanshri Shintre
भाजलेलं की उकडलेलं कॉर्न अधिक फायदेशीर? दोघांमधला आरोग्यदृष्ट्या फरक जाणून घ्या आणि योग्य पर्याय निवडा.
आगीवर भाजलेलं कॉर्न कुरकुरीत लागते, तर उकडलेलं कॉर्न अधिक मऊ, रसाळ आणि सौम्य चव असलेलं असते.
लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वांसाठी भाजलेलं आणि उकडलेलं कॉर्न दोन्ही आरोग्यासाठी फायदेशीर ठरते.
कोळसा किंवा लाकडावर भाजलेलं कॉर्न गॅसवरच्या तुलनेत अधिक नैसर्गिक, चविष्ट आणि आरोग्यासाठी उपयुक्त मानलं जातं.
कॉर्न उकळल्याने त्यातील काही पोषक तत्त्वे पाण्यात मिसळून जातात, त्यामुळे त्यांची पौष्टिकता कमी होऊ शकते.
कॉर्न भाजलेलं किंवा उकडलेलं खाणं फायदेशीर आहे, पण गॅसवर जास्त प्रमाणात ते शिजवणं टाळावं.
कॉर्नमध्ये असलेले व्हिटॅमिन-सी, फायबर आणि बायो फ्लेव्होनॉइड्स हृदयाचे आरोग्य राखून कोलेस्टेरॉल कमी करण्यात मदत करतात.
कॉर्नमधील कॅल्शियम आणि फॉस्फरस हाडांचे आरोग्य सुधारतात आणि त्यांना मजबूत ठेवण्यास महत्त्वाची भूमिका बजावतात.
कॉर्न खाल्ल्याने पचनक्रिया सुरळीत होते, डोळ्यांचे आरोग्य टिकते आणि वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत होते.