Dhanshri Shintre
कांदाभजी जितकी खमंग आणि कुरकुरीत असेल, तितकीच ती खाण्यात मजा आणते आणि चवही वाढते.
बऱ्याचदा कांदा भजी तळल्यानंतर अधिक मऊ पडतात पडतात.
हॉटेलमधील कांदाभजी कुरकुरीत लागतात, पण घरच्या भाजीत पाणी सुटते किंवा त्या मऊसर होतात, म्हणून फरक जाणवतो.
कांदा भजी परफेक्ट आणि खमंग हवी असेल तर काही खास टिप्स फॉलो करा, भजी नक्कीच कुरकुरीत होईल.
भजी तळताना तेल फार गरम नको. मध्यम आचेवर तेल तापवा, यामुळे भजी नीट तळतात आणि खमंग, कुरकुरीत तयार होतात.
कुरकुरीत भजीसाठी बेसनात थोडे तांदळाचे पीठ मिसळा, यामुळे भजी अधिक खमंग आणि चवदार होतील.
भजी तळल्यानंतर मऊ होऊ नयेत म्हणून योग्य मिश्रण करा. तेल जास्त शोषले तर गरम तेलात थोडं मीठ टाका, तेलकटपणा कमी होईल.
भजीचे बॅटर तयार करताना ते व्यवस्थित फेटून घ्या. भजी मस्त कुरकुरीत होतील.