Cold drinks : दररोज कोल्ड ड्रिंक प्यायल्यास काय होतं?

Surabhi Jayashree Jagdish

कोल्ड ड्रिंक

फ्रिजमधून थंडगार कोल्ड ड्रिंक काढून पिणं अनेकांना खूप आवडतं पण त्याचे शरीरावर होणारे दुष्परिणाम मात्र गंभीर असू शकतात. रोज कोल्ड ड्रिंक पिण्याची सवय हळूहळू शरीराला आजारी करते. विशेषतः लठ्ठपणा, डायबिटीज आणि हाडं कमकुवत होण्याचा धोका यामुळे वाढतो.

वजन वाढू शकतं

कोल्ड ड्रिंकमध्ये साखर आणि कॅलरीजचं प्रमाण खूप जास्त असते. यामुळे शरीरात अतिरिक्त चरबी साचू लागते आणि वजन वाढण्याचा धोका वाढतो. रोज कोल्ड ड्रिंक पिणाऱ्यांमध्ये लठ्ठपणाची समस्या अधिक दिसून येते.

ब्लड शुगर

कोल्ड ड्रिंकमध्ये असलेले हाय फ्रुक्टोज कॉर्न सिरप रक्तातील साखरेची पातळी वेगाने वाढवतात. त्यामुळे शरीरातील इन्सुलिनचं संतुलन बिघडू शकतं. सतत असे पेय प्यायल्याने डायबिटीजचा धोका वाढू शकतो.

इन्सुलिन रेजिस्टन्सची समस्या

रोज जास्त साखर घेतल्याने शरीर इन्सुलिनला योग्य प्रतिसाद देणं कमी करू शकतं. या स्थितीला इन्सुलिन रेजिस्टन्स म्हटलं जातं. यामुळे टाइप-२ डायबिटीज होण्याची शक्यता अनेक पटींनी वाढते.

दातांचं नुकसान

कोल्ड ड्रिंकमध्ये फॉस्फोरिक अॅसिड आणि कार्बोनिक अॅसिड असते. हे घटक दातांच्या बाहेरील संरक्षणात्मक थराला म्हणजेच एनॅमलला नुकसान पोहोचवतात. त्यामुळे दात कमकुवत होऊन कॅव्हिटीची समस्या निर्माण होऊ शकते.

हाडं कमकुवत होण्याचा धोका

कोल्ड ड्रिंकमधील फॉस्फोरिक अॅसिड शरीरातील कॅल्शियम कमी करण्याचं काम करू शकतं. त्यामुळे हाडांची ताकद हळूहळू कमी होऊ लागते. दीर्घकाळ ही सवय राहिल्यास हाडं ठिसूळ आणि कमजोर होण्याची शक्यता वाढते.

हेल्दी ऑप्शन निवडा

चवीसाठी आरोग्याशी तडजोड करणे टाळणे आवश्यक आहे. कोल्ड ड्रिंकऐवजी लिंबूपाणी, ताक किंवा नारळपाणी पिणं शरीरासाठी अधिक फायदेशीर ठरतं. हे पेय शरीराला नैसर्गिक ऊर्जा देतात आणि आरोग्य टिकवून ठेवण्यास मदत करतात.

Lemon water: लिंबू पाणी प्यायल्याने एसिडीटी वाढते की कमी होते?

digestion health
येथे क्लिक करा