Surabhi Jayashree Jagdish
अनेक लोक सकाळी उठल्यावर चहा किंवा कॉफी पितात. त्याऐवजी आवळा आणि कोरफडीच्या रसाचा पर्याय निवडता येऊ शकतो.
निरोगी राहण्यासाठी रोजच्या आहारात पौष्टिक पदार्थांचा समावेश करणं गरजेचं आहे. सकाळी उठल्यानंतर तुम्ही काय खाता किंवा पिता, याचा शरीरावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे दिवसाची सुरुवात संतुलित आहारानं आणि पुरेसं पाणी पिऊन करावी.
आवळा हा व्हिटॅमिन सी आणि अँटिऑक्सिडंट्सचा चांगला स्रोत आहे. कोरफडीच्या गरामध्ये पाणी आणि काही वनस्पतीजन्य घटक असतात. या रसाचं सेवन करताना योग्य प्रमाण निवडणं आणि कोरफडीचा पिण्यास सुरक्षित असलेला गर वापरणं महत्त्वाचं आहे.
कोरफडीच्या काही प्रकारांमध्ये घटक असतात ज्यामुळे शौच्यावेळी अडचणी येत नाहीत. त्यामुळे ज्यांना पचनसंस्थेचा त्रास आहे त्यांनी कोरफड आणि आळ्याचा रस प्यावा.
आवळ्यामध्ये असलेले व्हिटॅमिन सी शरीराच्या रोगप्रतिकारक यंत्रणेचं सामान्य कार्य सुरू ठेवण्यास मदत करते. आवळ्याच्या रसातून काही पोषक घटक मिळतात.
वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी रोजच्या आहारातून मिळणाऱ्या कॅलरी आणि शरीराकडून खर्च होणाऱ्या ऊर्जेचा समतोल महत्त्वाचा असतो. त्यामुळे जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर तुम्ही हा रस पिऊ शकता
शरीरातील निरुपयोगी पदार्थ बाहेर टाकण्याचे काम लिव्हर आणि किडनी करतात. आवळ्यामधील अँटिऑक्सिडंट्स आणि कोरफडीतील पाणी शरीराला काही पोषक घटक देऊ शकतात, पण हा रस लिव्हर स्वच्छ करतो किंवा रक्त शुद्ध करण्यास मदत करतो.
ही माहिती विविध सार्वजनिक स्रोतांवर आधारित असून केवळ सामान्य माहितीसाठी देण्यात आली आहे. या माहितीची स्वतंत्र वैद्यकीय पडताळणी आम्ही केलेली नाही. कोणतीही लक्षणे आढळल्यास स्वतः निष्कर्ष काढण्याऐवजी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या.