Manasvi Choudhary
सलग एक महिना रोज नियमितपणे कोरा चहा प्यायला, तर तुमच्या शरीरात काय बदल होतात ते या वेबस्टोरीतून जाणून घ्या.
कोरा चहामध्ये कॅलरीजचे प्रमाण खूप कमी असते तसेच त्यातील अँटी-ऑक्सिडंट्स शरीराची पचनक्रिया वेगवान करतात यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.
कोरा चहामधील कॅफिन मेंदूला त्वरित ऊर्जा देते यामुळे संपूर्ण दिवसभर मूड फ्रेश राहण्यास मदत होते.
कोरा चहा पचनासाठी हलका असतो. जेवणानंतर कोरा चहा घेतल्यास अन्न पचण्यास मदत होते आणि पोट जड होत नाही.
ब्लॅक टीमध्ये 'फ्लॅव्होनॉइड्स' असतात, जे रक्तातील खराब कोलेस्ट्रॉल कमी करते आणि रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास मदत करतात.
जर तुम्ही रिकाम्या पोटी किंवा खूप जास्त प्रमाणात कोरा चहा प्यायला, तर शरीरात ॲसिडचे प्रमाण वाढू शकते. यामुळे छातीत जळजळ किंवा गॅसची समस्या निर्माण होऊ शकते.
रात्री झोपण्यापूर्वी कोरा चहा प्यायल्याने झोप न लागणे किंवा निद्रानाशाचा त्रास होऊ शकतो.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.