Dhanshri Shintre
आजकाल अनेक लोक चष्म्याऐवजी कॉन्टॅक्ट लेन्स वापरतात, कारण त्या स्टायलिश आणि वापरण्यास अधिक सोयीस्कर असतात.
पावसाळ्यात कॉन्टॅक्ट लेन्स वापरणं डोळ्यांसाठी धोकादायक ठरू शकतं, त्यामुळे अधिक काळजी घेणं आवश्यक आहे.
पावसाळ्यात कॉन्टॅक्ट लेन्स वापरण्याआधी तुम्हीही या ५ महत्त्वाच्या गोष्टी नक्की लक्षात ठेवा.
पावसात आर्द्रता वाढते, त्यामुळे बॅक्टेरिया सक्रिय होतात आणि अस्वच्छ हातांनी लेन्स लावल्यास डोळ्यांना संसर्ग होण्याचा धोका वाढतो.
पावसात बाहेर पडताना चष्मा वापरा, कारण दूषित पाणी लेन्सवर पडल्यास डोळ्यांना संसर्ग आणि जळजळ होऊ शकते.
पावसात आर्द्रतेमुळे बुरशी वाढते, म्हणून लेन्स केस रोज स्वच्छ धुवा, सुकवा आणि नवीन सॉल्युशनच वापरा.
लेन्स लावल्यानंतर डोळ्यांत खाज, जळजळ किंवा लालपणा जाणवल्यास लगेच लेन्स काढा आणि डोळे स्वच्छ पाण्याने धुवा.
पावसाळ्यात दररोज लावता येण्यासारखे लेन्स सुरक्षित मानल्या जातात, कारण दररोज स्वच्छ आणि नवीन लेन्स वापरण्याची सवय होते.