Surabhi Jayashree Jagdish
छत्रपती शिवाजी महाराजांचा आहार साधा पौष्टिक होता. युद्ध मोहिमा, दैनंदिन सराव आणि कठोर दिनचर्या यामुळे त्यांचा आहार हलका पण शरीराला ताकद देणारा ठेवला जात असे.
राजसत्तेच्या वैभवात राहूनही त्यांनी कधीच अति ऐश्वर्यपूर्ण भोजनाची सवय ठेवली नाही. त्यांच्या जेवणात सहज उपलब्ध असलेले, पचायला सोपे आणि शरीरातील शक्ती टिकवून ठेवणारे पदार्थच असत.
ज्वारी-बाजरीच्या भाकऱ्या पचायला हलक्या आणि ऊर्जा देणाऱ्या असत. युद्धप्रवासात या भाकऱ्या सहज टिकत असल्याने सेना दलात याचाच वापर जास्त असे.
डाळी हा त्यांच्या आहाराचा महत्त्वाचा भाग होता. पौष्टीक, हलक्या आणि लवकर शिजणाऱ्या डाळी सैन्य मोहिमेतही सहज बनवल्या जात. त्यामुळे शरीराला ताकद, ऊर्जा आणि आवश्यक प्रथिने मिळत असत.
छत्रपती साधे पण पोषणमूल्य असलेलं अन्न खात असत. पालक, मेथी, शेपू यांसारख्या पालेभाज्यांचा वापर त्यांच्या राजभोजनातही नियमित असे.
अन्न स्वादिष्ट व पचायला सोपे राहावे म्हणून तूप खाल्ले जा. ताक, मठ्ठा यांचा उपयोग करून पचन सुधारण्यावर भर दिला जात असे.
भात हे रोजचे अन्न नव्हते, पण कधीमधी खिचडी स्वरूपात खाल्ले जाई. खिचडी पौष्टिक, पचायला हलकी आणि त्वरित ऊर्जा देणारी असल्याने विश्रांतीच्या दिवशी याला प्राधान्य दिले जाई.
छत्रपती शिवाजी महाराजांचा आहार अत्यंत साधा, संतुलित, शिस्तबद्ध आणि सैनिकांच्या जीवनशैलीला अनुरूप होता, असे अनेक बखरींमध्ये वर्णन आढळते. सब्हासद बखर, चिटणीस बखर, तसंच पंडित जगन्नाथांच्या शिवभारतमध्ये त्यांच्या संयमी आहाराचे उल्लेख आहेत.