Saam Tv
तुम्हाला माहितच असेल मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात अस्थमा दिवस साजरा केला जातो.
यंदा हा दिवस ६ मे २०२५ रोजी साजरा केला गेला.
दम्याच्या हा दिवस साजरा करण्यामागचे कारण म्हणजे, लोकांनामध्ये या आजारांची जागरुकता निर्माण व्हावी हे आहे.
पुढे आपण ज्या व्यक्तींना दमा असतो. अशा व्यक्तींनी कोणते पदार्थ खाणे टाळले पाहिजे या बद्दल जाणून घेणार आहोत.
सगळ्यात आधी दमा असलेल्या व्यक्तींनी थंड आणि आंबट पदार्थ खाणं टाळलं पाहिजे.
कारण समजा, तुम्ही थंड आईस्क्रीम किंवा आंबट पदार्थ घाता तेव्हा तुम्हाला खोकला सुरु होतो.
पुढे त्याचे रौद्र रुप झाल्याने दम्याचा त्रास अचानक वाढू लागतो.
शिवाय अस्थमा असलेल्यांनी शिळे पदार्थ खाणं टाळले पाहिजे. अन्यथा त्यांना भविष्यात भयंकर आजारांना सामोरं जावे लागू शकते.