Sakshi Sunil Jadhav
बाळ सहा महिन्याचं झालं की त्यांना विविध पदार्थ आपण खायला देऊ शकतो.
१ चमचा तांदूळ, तेवढेच पाणी शिजवून गाळून तुम्ही मुलांना देऊ शकता.
१ चमचा नाचणीचे पीठ १ कप पाण्यात भिजवून उकळून थंड करून मुलांना देऊ शकता.
१ लहान गाजर वाफवून मिक्सरमध्ये पेस्ट करून तुम्ही लहान मुलांना देऊ शकता.
सफरचंद सालीसकट वाफवून घ्या. मग साल काढून मिक्सरमध्ये प्युरी करून मुलांना भरवा.
अर्ध केळ हाताने मॅश करून तुम्ही मुलांना देऊ शकता.
थोडा लाल भोपळा वाफवून घ्या. मग मिक्सकरमध्ये प्युरी करून मुलांना द्या.
१ चमचा रवा भाजून पाण्यात शिजवून घ्या आणि मुलांना द्या.